• Sri Ramakrishna Lilaprasang (2 volume) Marathi

बंगालीतील श्रीरामकृष्ण लीलाप्रसंग या मूळ ग्रंथाचा हा मराठी अनुवाद आहे. मुल बंगाली ग्रंथ पाच खंडात आहे.  या ग्रंथाच्या प्रथम भागात  भगवान श्रीरामकृष्णाच्या दिव्य चरित्रातील पूर्व वृतांत आणि बालपण, साधकभाव व गुरुभाव - पूर्वार्ध हे खंड समाविष्ट करण्यात आले आहेत. द्वितीय भागात 'गुरुभाव - उत्तरार्ध, श्रीरामकृष्ण यांचा दिव्य भाव आणि नरेंद्रनाथ हे खंड समाविष्ट करण्यात आले आहे.
भगवान श्रीरामकृष्ण हे ईश्वरत्वाची, दिव्यत्वाची साक्षात मुर्तिच होते. अध्यात्मिक दिव्यत्वाचे स्वरूप कसे असते हे त्यांच्या पवित्र जीवनावरून कळून येते. त्यांच्या जीवनातून निःस्तृत झालेला अध्यात्मिक स्त्रोत जगभर पसरलेला दिसून येतो आणि या स्त्रोताने पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धातील असंख्य जीवने प्रभावित झालेली दिसून येतात. त्यांच्या अपूर्व जीवनाने व दिव्य वाणीने कितीतरी जीवाने यांना नवीन आशा, सांतवना, उत्साह व शांती प्राप्त झाली आहे. आणि त्यांचे अज्ञान नष्ट होऊन त्यांना ज्ञानलोक लाभला आहे.

ज्या जीवनात ज्ञान, भक्ती व कर्म यांचा परमोच्च विकास दिसून येतो, जे जीवन पावित्र्याचे व कामगन्धहिन प्रेमाचे मूर्तिमंत प्रतिक आहे आणि ज्या जीवनात नाना मतांच्या व नाना धर्मांच्या साधनांचे अनुष्ठान होऊन त्या त्या साधनांचे अंतिम लक्ष्य हस्तगत झालेले आहे. अश्या सर्वांग परिपूर्ण जीवनाचे सांगोपांग वर्णनं आणि विश्लेषण त्यांच्याच एका अधिकारी अंतरंगी शिष्याने - श्रीमत स्वामी सारादानंद ह्यांनी श्रीरामकृष्णलीलाप्रसंग ग्रंथात केले आहे. म्हणूनच उपलब्ध असलेल्या श्रीरामकृष्ण ह्यांच्या सर्व चरित्र मध्ये श्रीरामकृष्णलीलाप्रसंग हा चरित्र ग्रंथ केवळ अधिक विस्तृत नव्हे तर अधिक अधिकृत व आधी विश्लेषणात्मक  आहे. या दृष्टीने प्रस्तुत ग्रंथ म्हणजे धर्म व तत्वज्ञान यांचा विशाल कोशच आहे.

अशा या अपूर्व ग्रंथाच्या अध्ययनाने वाचकांना ज्ञानाचा प्रकाश व मानसिक शांती लाभो हीच नम्र प्रार्थना आहे.

Author: Swami Saradanada  Total Pages :1079  Weight: 1520 gm

Sri Ramakrishna Lilaprasang (2 volume) Marathi

  • Product Code: M-83A300
  • Availability: 19
  • Rs.300.00


Tags: Sri Ramakrishna