• इंडोनेशियातील व्याख्यान दौऱ्याच्या माइया आठवणी / Indoneshiyatil Vyakhyan Dauryachya Mazya Athavani

रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन या जुळ्या जागतिक संस्थेचे तेरावे संघाध्यक्ष श्रीमत् स्वामी रंगनाथानंदजी महाराज इ.स. 1957 ते 1987 पर्यंत तीस वर्षे भारत सरकार तर्फे भारताचे सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून दर वर्षी जगातील अनेक देशांचा व्याख्यान दौरा करीत असत. स्वामी रंगनाथानंदजी भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचे आणि श्रीरामकृष्ण-विवेकानंद ज्ञानपरंपरेचे समर्थ प्रचारक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक देशांमध्ये विद्वान श्रोत्यांपुढे विविध विषयांवर व्याख्याने दिलीत. त्या व्याख्यान दौर्यांविषयीचा जो तपशील त्यांनी लिहून ठेवला तो भारतीय विद्या भवन, मुंबई द्वारे A Pilgrim Looks at the World या नावाने दोन भागांत ग्रंथ रूपाने प्रकाशित करण्यात आला आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘इंडोनेशियातील व्याख्यान दौर्याच्या माझ्या आठवणी’ हे पुस्तक मराठीत आम्ही प्रकाशित करीत आहोत. त्यांनी लिहिलेल्या आठवणी विविध माहितींनी परिपूर्ण असून इंडोनेशियाची संस्कृती आपल्या भारतीय प्राचीन संस्कृतीशी जुळणारी आहे. विभिन्न देशातील संस्कृतीशी सौहार्दपूर्ण मेळ साधण्यामध्ये रुची असणार्या वाचकांना हे पुस्तक आवडेल.

Author :SWAMI RANGANATHANANDA, RAMAKRISHNA MATH

इंडोनेशियातील व्याख्यान दौऱ्याच्या माइया आठवणी / Indoneshiyatil Vyakhyan Dauryachya Mazya Athavani

  • Rs.20.00


Tags: Swami Ranganathananda