• जीवनाचे उद्दिष्ट (धर्माचे विज्ञान आणि तत्त्वज्ञान) / Jivanache Uddishta

इ.स. 1896 साली स्वामी विवेकानंदांनी न्यूयॉर्क येथे काही धार्मिक वर्ग घेतले. या वर्गात धर्माच्या शास्त्रीय स्वरूपावर व त्याच्या विविध अंगांवर त्यांनी जी विद्वत्तापूर्ण भाषणे दिली त्यांचाच हा मराठी अनुवाद आहे. प्रस्तुत पुस्तकांत स्वामी विवेकानंदांनी सांख्य व अद्वैत या मतांचे विशेषेकरून विवरण केले आहे. या दोन मतांची तुलना करून त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत व त्यांच्यात कोणता भेद आहे हे स्वामी विवेकानंदांनी या भाषणात आपल्या ओघवती वाणीने दर्शवून दिले आहे. धर्माचे तत्त्वज्ञान आणि धर्माची मूलतत्त्वे जाणल्याशिवाय धर्मशास्त्राची खरीखुरी कल्पना येऊ शकत नाही व धर्माच्या स्वरूपाचे आकलनही होऊ शकत नाही. धर्मसुद्धा एक विज्ञान आहे आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर तो उतरू शकतो हे सत्य स्वामी विवेकानंदांनी तर्कशुद्ध पद्धतीने या व्याख्यानांमधे पटवून दिले आहे. त्याबरोबरच वेदान्तप्रणीत अद्वैतमताने आदर्श जीवन कसे घडविता येते याचेही दिग्दर्शन स्वामी विवेकानंदांनी प्रस्तुत पुस्तकात केले आहे.

Swami Vivekananda

Ramakrishna Math, Nagpur,

जीवनाचे उद्दिष्ट (धर्माचे विज्ञान आणि तत्त्वज्ञान) / Jivanache Uddishta

  • Rs.20.00