• प्रिय साधकांनो  / Priya Sadhakanno

प्रस्तुत पुस्तक भगवान श्रीरामकृष्णांचे अंतरंग लीलासहचर स्वामी तुरीयानंद वा हरीमहाराज यांनी गृही तसेच संन्यासी साधकांना वेळोवेळी लिहिलेल्या अतिमूल्यवान पत्रांचे संकलन आहे. स्वामी तुरीयानंद हे वेदान्ताची प्रतिमूर्ती होते. ‘‘जीवन्मुक्तिसुखप्राप्तिहेतवे जन्म धारितम्। आत्मना नित्यमुत्तेन न तु संसारकाम्यया॥ (जीवन्मुक्तीच्या आनंदात — आत्मानंदात — डुंबून राहण्यासाठीच नित्यमुक्त अशा आत्म्याने हे शरीर धारण केलेले आहे; अज्ञानजनित संसाराच्या रहाटगाडग्यात हिंदकळण्यासाठी नव्हे.) हे होते त्यांच्या जीवनाचे स्वरूप! प्रगाढ अनुभूती, अगाध पांडित्य व ओजस्वी भाषा यांची देणगी अंगी असूनही स्वामी तुरीयानंदांनी काहीच ग्रंथरचना केली नाही. एकदा यासंबंधी एका संन्याशाने पृच्छा केली असता त्यांनी उत्तर दिले होते — ‘‘मला जगाला जे काय द्यावयाचे होते ते मी माझ्या पत्रांमधून दिले आहे.’’ असे आहे या पत्रांचे स्वरूप! अशा या पत्रांचा मराठीभाषिक साधकांनाही लाभ घेता यावा या उद्देशाने मूळ बंगालीतील या पत्रांपैकी काहींचा मुळावरून केलेला अनुवाद.

प्रिय साधकांनो / Priya Sadhakanno

  • Rs.55.00