• स्वामी विवेकानंदांची मातृभक्ती / Swami Vivekananda Yanchi Matrubhakti

स्वामी विवेकानंदांनी आपल्या उत्कृष्ट गुणांचे श्रेय आपल्या जन्मदात्री आईला दिले आहे. संन्याशाने सर्व मायापाश तोडलेले असले तरी आपल्या आईचे नि:स्वार्थ प्रेम तो कधीच विसरू शकत नाही. स्वामीजींची आई भुवनेश्वरीदेवी भारतीय संस्कृतीच्या आधारस्तंभ असलेल्या विविध उत्कृष्ट गुणांच्या मूर्तरूप होत्या. श्रीमंत उच्चकुलात जन्मलेली एकुलती एक कन्या कलकत्ता हायकोर्टाचे प्रसिद्ध वकील श्री. विश्वनाथ दत्तांची पत्नी म्हणून दत्तांच्या घरी येते व तेथील एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कौटुंबिक जाचाला सहन करून सर्वांना सावरून घेते. आपल्या सर्व अपत्यांना उच्च शिक्षणासोबतच खरे खरे माणूस बनण्याचे प्रशिक्षण देते आणि स्वामी विवेकानंदांसारखी लोकोत्तर विभूती जगाला देते ही भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील उज्ज्वल कहाणी आहे. सर्वसंगपरित्यागी पूज्यपाद श्रीशंकराचार्यांप्रमाणे हिंदुधर्म व तत्त्वज्ञानाचा देदीप्यमान प्रकाश सार्या जगात पसरविणार्या स्वामी विवेकानंदांची मातृभक्ती ही आपणा सर्वांना चिंतनीय व अनुकरणीय आहे. वेदान्त सोसायटी, न्यूयॉर्क (अमेरिका)चे प्रमुख, स्वामी तथागतानंद यांनी कोलकाता येथील स्वामी विवेकानंदांच्या पूर्वजांचे घर व सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी Swamiji and Divine Motherhood या विषयावरील चर्चासत्रात जे इंग्रजी भाषण दिले होते ते त्या संस्थेने पुस्तकरूपात प्रकाशित केले आहे.

Author Swami Tathagatananda

Translated by Prof. K. T. Kolate

Publisher Ramakrishna Math, Nagpur

स्वामी विवेकानंदांची मातृभक्ती / Swami Vivekananda Yanchi Matrubhakti

  • Rs.12.00