• Amrutasya Putrah (अमृतस्य पुत्रः)

स्वामी विवेकानंदांच्या ग्रंथावली च्या दहा खंडातून म्हणजे जवळ जवळ ३५०० पेक्षा अधिक पृष्ठांतून स्वामीजींचे हे विचारधन आपल्यापर्यंत पोहोचते. स्वामीजींच्या या सर्वच विचारधनाचे वाचन व मनन चिंतन आपण करू शकलो तर आपण धन्य होऊच पण आपल्या विचारदशेत निश्चितपणे परिवर्तन होऊन आपले अवघे जीवनच उजळून निघेल, यात तिळमात्र संशय नाही. तथापि सध्याच्या अति वेगवान आणि अत्यंत व्यस्त अश्या जीवनशैलीत सर्वांनाच समग्र ग्रंथावालीचे वाचन करणे सहज शक्य होणारे नाही. म्हणून अश्या लोकांसाठी आम्ही येथे स्वामीजींच्या निवडक विचार संपदेचे संकलन केलेले आहे. हे संकलन आम्ही अश्या रीतीने केलेले आहे कि स्वामीजींच्या नवसंजीवक विचारांचे सारसर्वस्व वाचकांपर्यंत पोहोचावे. एवढ्यानेही स्वामीजींच्या आश्वासक व शक्तिदायी विचारांद्वारे त्यांच्या जीवनात अपेक्षित परिवर्तन घडेल आणी ते एका यशस्वी, समृद्ध व पवित्र जीवनाचा नवा श्वास घेऊ शकतील. ' अमृताचे पुत्र ' होण्याचे दिशेने त्यांची वाटचाल सुरु होईल. असेच वेचक विचारधन आम्ही या ग्रंथात संकलित केलेले आहे.

 

This is amazing book on Swami Vivekananda's message to modern man on various topics such as Practical Vedanta, Mediation, Work and its secret, his vision on modern india. This book has forward from Dr. Abdul Kalam. Nice print and easy to understand, great collection at a cheap cost and nice to have in your library.

Author: A compilation Pages: 150   Weight: 750 gm      Type: Hard cover

Amrutasya Putrah (अमृतस्य पुत्रः)

  • Product Code: M-246250
  • Availability: Out Of Stock
  • Rs.250.00


Tags: On Swami Vivekananda