• Matrucharani

मानव जातीच्या उद्धारासाठी परब्रम्ह युगीयुगी नरदेह धारण करून धरधामी अवतारात असते. वर्तमान युगात ते श्रीरामकृष्ण रुपात अवतरले. परब्रम्हाच्या या सांप्रताच्या नरलिलेत सहाय्यक होऊन युगप्रयोजन सिद्धीस नेण्याकरिता ब्रह्मशक्ती हि श्रीसारदादेवी रुपात अवतीर्ण झाली. अग्नी आणि त्याच्या दाहक शक्ती प्रमाणे ब्रह्म आणि  ब्रह्मशक्ती अभिन्न होत. म्हणून श्रीरामकृष्ण आणि श्रीसारदादेवी यांच्यात स्वरूपतः काहीही भेद नाही. परंतु असे असले तरी अभीव्यक्तीच्या दृष्टीने पाहता दोघांच्या जीवनात आपल्याला निरनिराळी वैशिष्टे आढळून येतात. या वैशिष्ट्यांचे श्रद्धापूर्वक अनुशिलन केले म्हणजे परमार्थ स्वरुपाची स्पष्ट कल्पना येत.

श्रीसारदादेवी - माताजी- तर या सर्वांच्याच आई होत्या. आपल्या लीलाजीवनात 
श्रीरामकृष्ण ज्या दिव्य मातृभावाचे उपासक म्हणून वावरले त्या दिव्य मातृभावाची श्रीसारदादेवी मूर्तिमंत प्रतिमाच होत्या. तसे तर त्यांचे जीवन म्हणजे आदर्श नारीत्वाचा सर्वोच्च  विकासाच होय. त्या आदर्श कन्या होत्या. आदर्श पत्नी होत्या. आदर्श संन्यासिनी होत्या. आदर्श शिष्या होत्या. आदर्श गुरु होत्या.

श्रीरामकृष्ण यांच्या लीलासंवरणानंतर सुमारे चौतीस वर्षे नरदेहात राहून माताजींनी असंख्य जीवांचा उद्धार केला. माताजी सहज सरळ भाषेत, अल्प शब्दात  जे काही बोलत त्यात श्रोत्यांचे जीवन अमुलाग्र बदलून टाकण्याचे सामर्थ्य असे. सुदैवाने अश्या परमभाग्यवान व्यक्तींपैकी काहींनी आपल्या दैनंदिनीत माताजीनीची संभाषणे लिपीबद्ध करून ठेविली होती. त्या भावपूर्ण संभाषणांचा इतरांना लाभ घेता यावा म्हणून माताजींच्या लीलासंवरणानंतर लवकरच उदबोधन  कार्यालयातर्फे त्यांचे संकलन 'श्री श्री मायेर कथा' या नावाने दोन खंडात प्रसिद्ध झाली. त्या मूळ बंगाली ग्रंथाचा मराठी अनुवाद या पुस्तकाच्या रुपात प्रसिद्ध झाला आहे.

Matrucharani

  • Product Code: M-110140
  • Availability: 27
  • Rs.140.00


Tags: Sri Sarada Devi