
 Rs.20.00 
Delivery
 Author 
 Swami Vivekananda  Pages 
 44  Translator 
 Dr. Narayanshastri Dravid Choose Quantity
 Product Details 
अमेरिकेत असताना स्वामी विवेकानंदांची ज्ञानमार्गावर प्रवचने झाली आणि त्यांची एक सुप्रसिद्ध अमेरिकन शिष्या कुमारी एस्. ई. वॅल्डो यांनी ती लिहून घेतली. स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधु स्वामी सारदानंद हे जेव्हा इ.स. 1896 साली अमेरिकेत प्रचारकार्य करीत होते तेव्हा त्यांनी ही प्रवचने कुमारी वॅल्डो यांच्या वहीवरून जशीच्या तशी उतरून घेतली. प्रस्तुत पुस्तक म्हणजे या प्रवचनांचा संग्रह होय. स्वामी विवेकानंदांनी या प्रवचनांमधे साधकाला ज्ञानमार्ग हा मुक्तीच्या ध्येयाकडे कसा घेऊन जातो हे समजावून सांगितले आहे. उपनिषदे आणि गीता यांच्या साहाय्याने त्यांनी हा ज्ञानमार्ग विशद करून सांगितला आहे. ज्ञानमार्गात यशस्वी होण्यासाठी कोणते गुण व कोणती साधना आवश्यक आहे याचेही त्यांनी या प्रवचनांमधे सुबोध पद्धतीने विवेचन केले आहे. ज्ञानमार्गाचे अनुसरण करून आत्मज्ञानात प्रतिष्ठित झाले म्हणजे शाश्वत सुखाची कशी प्राप्ती होते हेही त्यांनी या प्रवचनांमधे तर्कसंगत रीतीने पटवून दिले आहे. आदर्श जीवन घडविण्याकरता ज्ञानमार्ग हा कसा उपयुक्त आहे यासंबंधीचे स्वामी विवेकानंदांचे ओजस्वी विचार सर्वांनाच मार्गदर्शक ठरतील.


