M182 Swamijinche Charanashrit (स्वामीजींचे चरणाश्रित - सन्याशी शिष्य)
Non-returnable
Out of stock
Tags:
Rs.125.00
Author
Swami Abjajananda Pages
331 Translator
Smt. Shakuntala D Punde Product Details
भगवान श्रीरामकृष्णांचे अंतरंगीचे संन्यासी पार्षद म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांच्या त्यागरूपी आदर्शाचे मूर्तिमंत प्रतीकच होत. स्वामी गंभीरानंदकृत ‘श्रीरामकृष्ण भक्तमालिका’ या ग्रंथाच्या प्रथम भागामध्ये त्यांची चरित्रे आपल्याला वाचावयास मिळतात. भगवान श्रीरामकृष्णांचे प्रमुख शिष्य स्वामी विवेकानंद यांचेदेखील असेच कित्येक संन्यासी शिष्य होते की ज्यांच्या जीवनातून — चरित्रांतून आपल्याला स्वामीजींचा कर्मयोगाचा — ‘शिवभावे जीवसेवे’चा आदर्श प्रस्फुटित होताना दिसतो. त्याबरोबर स्वामीजींचा उदार आध्यात्मिक भाव व त्यांच्या शिष्यांची त्यांच्याविषयीची भक्तीही दृग्गोचर होते.