Product Details
ब्रह्मलीन स्वामी अपूर्वानंदजी यांनी महापुरुष स्वामी शिवानंदजींच्या आठवणी संकलित करून ‘शिवानन्द-स्मृतिसंग्रह’ या नावाने बंगाली भाषेमधून प्रकाशित केल्या. व नंतर त्या नागपूर मठाद्वारे हिंदीमधून ग्रंथरूपात तीन खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आल्या. श्रीमत् स्वामी शिवानंदजी महाराज हे ‘महापुरुष महाराज’ या नावाने देखील विख्यात आहेत. ते भगवान श्रीरामकृष्णदेवांचे अंतरंग पार्षद आणि रामकृष्ण मठ आणि मिशनचे महाध्यक्ष होते. त्यांचे दैवी जीवन ईश्वरानुभूती, ज्ञान आणि भक्ती यांचे साक्षात उदाहरण होते. त्याचबरोबर मनुष्यमात्रांची सेवा, नि:स्वार्थ प्रेम तसेच त्याग आणि तपस्या यांचा त्यांचे जीवन ज्वलंत आदर्श होते. भगवान श्रीरामकृष्णदेवांच्या चरणकमली त्यांनी केलेले आत्मसमर्पण खरोखरच अनुसरणीय असे होते. त्यांचा प्रत्येक शब्द आणि त्याचबरोबर त्यांचे कार्य खर्या खर्या आध्यात्मिक जीवनाचे प्रतीक होते. हजारो धर्मपिपासू भक्त त्यांची कृपा प्राप्त करून धन्य झाले होते आणि कित्येक जणांना त्यांच्या अमृतवाणीने आणि पावन सान्निध्याने शांती व चैतन्य यांची अनुभूती झाली होती. अशा कित्येक संन्याशांनी आणि गृहस्थ भक्तांनी त्यांच्या आठवणी लिपिबद्ध करून ठेवल्या होत्या व काहींनी लेखकाच्या विनंतीनुसार लिहून पाठविल्या. या सार्या आठवणी भक्तिभावाने ओतप्रोत आणि शिक्षाप्रद तसेच प्रेरणादायी अशा आहेत.