Rs.30.00
Author
Compilation Pages
30 Translator
Smt. Sandhya Aagate Choose Quantity
Product Details
स्वामी विज्ञानानंद हे श्रीरामकृष्णांच्या अंतरंग शिष्यांपैकी एक होते, आणि इ.स. 1937 मध्ये श्रीरामकृष्ण मठ व मिशनचे चौथे महाध्यक्ष झाले. अलाहाबाद येथील श्रीरामकृष्ण मठाची स्थापना आणि त्याचा विस्तार त्यांनी केला. इ.स. 1910 ते 1938 या कालावधीत ते या मठाचे प्रमुख होते. इ.स. 1938 मध्ये ते महासमाधीत लीन झाले. इ.स. 1920च्या पूर्वार्धात वेगवेगळ्या प्रसंगी स्वामीजींनी अलाहाबाद येथील मठात केलेल्या धर्मचर्चेचा आणि आध्यात्मिक संभाषणांचा हा संग्रह आहे. स्वामी अपूर्वानंद यांनी संकलित केलेल्या मूळ बंगाली भाषेतील पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद अलाहाबाद येथील श्रीरामकृष्ण मठाने प्रकाशित केला होता. त्या पुस्तकावरून केलेला अनुवाद नागपूर मठाद्वारे प्रकाशित होणार्या ‘जीवन-विकास’ या मासिकात क्रमश: प्रकाशित झाला होता. स्वामी विज्ञानानंदांच्या या संभाषणांची उपयुक्तता लक्षात घेऊन प्रस्तुत अनुवाद आम्ही पुस्तकरूपात प्रकाशित करीत आहोत. या पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये स्वामी विज्ञानानंदांचा सेवक ‘वेणी’ याचे एक छोटेसे चरित्र देण्यात आले आहे, तसेच महाराजांनी त्याला लिहिलेली काही हिंदी पत्रे देखील समाविष्ट करण्यात आली आहेत.