Rs.25.00
Author
Swami Vivekananda Pages
84 Translator
R R Deshapande Choose Quantity
Product Details
स्वामी विवेकानंदकृत "भारताचे जीवनध्येय" (जुने – भारताची आध्यात्मिक विचारधारा) या पुस्तकाची ही आवृत्ती वाचकांच्या हाती देताना आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात स्वामी विवेकानंदांच्या काही व्याख्यानांचे व लेेखांचे संकलन केले आहे. या व्याख्यानांत आणि लेखांत स्वामी विवेकानंदांनी भारताच्या आध्यात्मिक संपदेचे यथार्थ दर्शन घडविले आहेे. अध्यात्म वा धर्म हा भारताचा आत्मा असल्यामुळे अध्यात्माला भारतीय जीवनात अनन्यसाधारण स्थान आहे. यासाठीच भारतीय आध्यात्मिक विचारधारेचे स्वरूप समजून घेणे फारच अगत्याचे आहे. अध्यात्माची तात्त्विक बाजू कोणती आणि व्यवहार्य बाजू कोणती याचे स्वामी विवेकानंदांनी आपल्या व्याख्यानांमधून व लेखांमधून जे विवरण केले आहे ते मूलग्राही असून पौर्वात्यांना व पाश्चात्त्यांना पटेल असेच आहे. आध्यात्मिक साधना ही मुख्यत: मनाशी संबद्ध असल्यामुळे मनाचे गुणधर्म कोणते, मन एकाग्र कसे करावे, मन ध्यानात लीन कसे करावे इत्यादी गोष्टींचे साधकाला ज्ञान असणे आवश्यक आहे. भारताने दिलेल्या आध्यात्मिक संदेशाची समग्र जगाच्या कल्याणासाठी अपरिहार्य आवश्यकता आहे असे स्वामी विवेकानंदांना प्राणोप्राण वाटत असे. या संदेशाचे स्वरूप काय आहे आणि भारताने जगाला कोणती आध्यात्मिक व सांस्कृतिक देणगी दिली आहे यासंबंधीचे त्यांचे विवेचन उद्बोधक असून ते सर्वांना मार्गदर्शक ठरेल.