Product Details
भगवान श्रीरामकृष्ण हे दिव्यत्वाची सजीव प्रतिमाच होत. त्यांचे जीवन म्हणजे सनातन धर्माचे मूर्त रूप होय. ते स्थलकाल-निरपेक्ष असून अखिल मानवजातीला पथप्रदर्शन करणारे असे आहे. त्यांच्या जीवनातील अगदी सामान्य प्रसंगांना देखील गूढ गहन अर्थ आहे. त्यांच्या उक्ती म्हणजे नुसते शब्द नसून त्यांतून त्यांची अनुभूतीच प्रकटली आहे व याच कारणास्तव त्यात माणसाच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचे उत्कट सामर्थ्य आढळून येते. अशा महान दिव्य चरित्राच्या एका संक्षिप्त आवृत्तीची उणीव अनेक दिवसांपासून भासत होती. प्रस्तुत प्रकाशनाने ती दूर झाली. प्रस्तुत पुस्तक वाचकांना स्फूर्तिदायक व मार्गदर्शक ठरेल.