Book Store | Ramakrishna Math Pune
0
VEDANT ANI JIVAN -21

M018 Vedant Ani Jivan (वेदान्त आणि जीवन : ज्ञानयोगाचा पूरक ग्रंथ)

Non-returnable
Out of stock
Rs.21.00
Author
Swami Vivekananda
Pages
100
Translator
Swami Shivatattwananda
Product Details
"आचरणात आणणे अगदी असंभवच असेल तर कोणत्याही तत्त्वाला एक बौद्धिक कसरत यापरीस आणखी काहीच मूल्य नाही. वेदान्त हा धर्म आहे. आणि त्या दृष्टीने तो सर्वतोपरी आचरणात आणण्याजोगा असावयासच हवा. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तो आचरता येणे आपल्याला शक्य झाले पाहिजे. ... निबिड अरण्यात व गिरिकंदरात जन्मलेली ही गहन तत्त्वे गजबजत्या नगरनगरींच्या कोलाहलमय जीवनात कशी मूर्त स्वरूपास आणली गेली हे आपण समजून घ्यावयास हवे.’’ — लंडन येथे 10 नोव्हेंबर 1896 रोजी ‘वेदान्त आणि जीवन’ (Practical Vedant) या विषयावर व्याख्यान देताना स्वामी विवेकानंदांनी असे उद्गार काढले होते. वेदान्तातील चिरंतन आदर्श प्रत्यक्ष जीवनात कसे आणता येतील याचे स्वामीजींनी लंडन येथे चार व्याख्याने देऊन अत्यंत स्फूर्तिदायी व सुबोध विवरण केले आहे. ती व्याख्याने अत्यंत लोकप्रिय झाली होती. इंग्रजीत ती ‘‘Practical Vedant’’ नामक पुस्तकाच्या रूपाने प्रसिद्ध आहेत.
Added to cart
- There was an error adding to cart. Please try again.
Quantity updated
- An error occurred. Please try again later.
Deleted from cart
- Can't delete this product from the cart at the moment. Please try again later.