Rs.35.00
Author
Swami Vivekananda Pages
178 Translator
Swami Shivatattwananda Choose Quantity
Product Details
शिकागो येथील सुप्रसिद्ध ‘सर्वधर्मपरिषदे’ नंतर अमेरिकेत नाना स्थानी अनेक व्याख्याने दिल्यानंतर 1895 साली स्वामी विवेकानंद ‘सहस्रद्वीपोद्यान’ (Thousand Island Park) नामक एका शांत व एकांत स्थानी राहावयास गेले. हे निवांत स्थान न्यूयॉर्कजवळ असून रमणीय निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. स्वामीजींचे काही शिष्य त्यांच्या पवित्र सहवासाचा लाभ व्हावा या उद्देशाने त्यांच्याबरोबर या ठिकाणी राहावयास गेले होते. तेथील आपल्या निवासकालात स्वामीजी दररोज आपल्या शिष्यांना आध्यात्मिक विषयांवर उपदेश देत. स्वामी विवेकानंद हे वेदान्ताचे आधुनिक कालातील एक थोर द्रष्टे होते आणि त्यांनी भारतात व भारताबाहेर पाश्चात्त्य देशात वेदान्ताचा मोठमोठ्या सभांतून प्रसार केला. पण ‘सहस्रद्वीपोद्यानां’त त्यांनी जो उपदेश केला त्याचे वैशिष्ट्य हे आहे की हा उपदेश त्यांनी आपल्या निवडक शिष्यांना जगाच्या कोलाहलापासून दूर अशा निवांत स्थानी केला आहे. या उपदेशांतून स्वामीजींचे आदर्श गुरुरूप अभिव्यक्त होते. स्वामीजींचे हे उपदेश अत्यंत उच्च अशा आध्यात्मिक अवस्थेत स्फुरलेले आहेत आणि म्हणूनच त्यांत त्यांच्या दिव्य प्रज्ञेचा आणि त्यांच्या सखोल व उत्कट आध्यात्मिक अनुभूतींचा आपल्याला प्रत्यय येतो. या उपदेशांत त्यांनी वेदान्ताबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक विषयांचे आपल्या शिष्यांसमोर मर्मस्पर्शी भाषेत विवेचन केले व धर्मसाधना करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. ज्या शिष्यांना स्वामीजींचा हा पावन सहवास लाभला ते खरोखर भाग्यवान होत, धन्य होत.