Product Details
या पुस्तकामधे स्वामी विवेकानंदांच्या ग्रंथावलीमधून ‘जाती, संस्कृती आणि समाजवाद या विषयावरील उद्बोधक व मौलिक असे विचार संकलित करण्यात आले आहेत. यांमधे स्वामीजींनी हिंदू संस्कृतीच्या सामाजिक व्यवस्थेची पाश्चात्त्य सामाजिक व्यवस्थेशी तुलना करून सामाजिक उन्नतीच्या रहस्यावर प्रकाश टाकला आहे. आपल्या या महान हिंदू संस्कृतीचा एक वैशिष्ट्यपूर्ण असा आदर्श आहे आणि त्या आदर्शावर आपली संपूर्ण जातिव्यवस्था उभी आहे. खरे तर पूर्वीच्या काळात ही जातिव्यवस्था कित्येक बाबतींत गौरवशाली सिद्ध झाली होती. परंतु सद्यस्थितीत मात्र तिचा तो गौरव धुसर झाल्याचे आपल्याला आढळते. आपल्या संस्कृतीचा तो विशेष आदर्श काय होता की ज्याच्या बलाने आपला भारत देश समस्त राष्ट्रांच्या अग्रणी होता. आपल्या संस्कृतीचे पतन कसे झाले व ती आज हीन दशेला कशी पोचली? या सर्वाचे चित्र स्वामीजींनी अत्यंत सूक्ष्मतेने आपल्या मर्मस्पर्शी भाषेत अंकित केले आहेत.