Product Details
स्वामी तुरीयानंद जणू त्याग, वैराग्य आणि ज्ञान यांची सजीव मूर्तीच होते. त्यांचे तपःपूत तेजस्वी जीवन सगळ्या साधकांना आदर्शरूप आहे. ते सदासर्वदा अत्युच्च अशा भावभूमीवर विचरण करीत असत. त्यांच्याबरोबर राहताना सामान्य माणसाचे मन सुद्धा आध्यात्मिक भूमीवर आरूढ होत असे आणि त्याच्या मनात ईश्वरप्राप्तीची तीव्र आकांक्षा नि त्यासाठी लागणारी साधनेविषयीची प्रबळ प्रेरणा निर्माण होत असे. स्वामी तुरीयानंदांच्या श्रीमुखातून धर्मजीवनासंबंधीची गूढ गहन तत्त्वे सहज, सोप्या भाषेत सर्वसाधारण संभाषणाच्या रूपात प्रकट होत असत. त्यामुळे साधकश्रोत्यांच्या जीवनातील अनेक कठीण समस्यांची उकल होऊन त्यांना नवीन प्रकाश प्राप्त होत असे. महाराजांच्या सन्निध राहून त्यांचे अमूल्य संभाषण ऐकण्याचा ज्यांना लाभ मिळाला आहे, त्यांच्यापैकी काही भाग्यवान साधकांनी आपल्या दैनंदिनीत त्या संभाषणांचा काही भाग लिपिबद्ध करून ठेवला होता. त्याचाच हा मराठी अनुवाद आहे.