Book Store | Ramakrishna Math Pune
0
SRIMAD BHAGAVAD GITA SARTH -M132-45

M132 Srimad Bhagavad Gita: With Marathi Translation (श्रीमद्भगवद्गीता : सार्थ)

Non-returnable
Out of stock
Rs.45.00
Author
N/A
Pages
309
Product Details
जगातील सर्वच धर्मग्रंथांत गीतेचे स्थान अद्वितीय असे आहे. खरे पाहता गीतेला भारतीय धर्म, दर्शन आणि संस्कृती यांचे प्रतीक व प्रतिनिधिस्वरूप म्हणता येईल. तरी पण गीतेत विद्यमान असलेले सत्य केवळ भारतीय लोकांपुरतेच मर्यादित नसून ते कोणत्याही देशातील, काळातील, जातीतील, वर्णातील, आश्रमातील व संप्रदायातील मानवासाठी सारखेच उपयुक्त आहे, कारण गीता ही सार्वभौम, सार्वजनीन अशा सत्यसिद्धान्ताचे प्रतिपादन करते. आपल्या सनातन धर्माचे मूळ म्हणजे वेद. इतर सर्व धर्मग्रंथ या वेदांत प्रतिपादिलेल्या धर्माला समजावून सांगण्यासाठीच रचण्यात आले. विषयवस्तूच्या दृष्टिकोनातून वेदांचे दोन प्रमुख विभाग मानण्यात येतात – कर्मकांड आणि ज्ञानकांड. कर्मकांडात यज्ञादी कर्मांचा व ज्ञानकांडात ब्रह्मविद्येचा वा अध्यात्मज्ञानाचा समावेश होतो. ज्ञानकांडातच उपनिषदांचा अंतर्भाव होतो. उपनिषद्भाग हा वेदांचा अंतिम उपदेश असल्याकारणाने त्याला वेदान्त ही संज्ञा देण्यात आली आहे. वेदान्तशास्त्राची तीन प्रस्थाने मानण्यात आली आहेत. ती म्हणजे – (१) श्रौत प्रस्थान (· उपनिषदे), (२) स्मार्त प्रस्थान (·गीता), आणि (३) दार्शनिक किंवा तात्त्विक प्रस्थान (· व्यासप्रणीत ब्रह्मसूत्रे). यावरून गीतेचे महत्त्व आपल्या लक्षात सहज येऊ शकेल. महाभारताच्या अंतर्गत असल्यामुळे गीता हा स्मृतिग्रंथ आहे खरे, तरी पण आपल्या वैशिष्ट्यामुळे गीतेची गणना उपनिषदांच्या वर्गातच होते. गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी जी पुष्पिका येते तीत आपल्याला ‘इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे ...’ असा उल्लेख आढळतो. त्यावरून आपल्याला स्पष्ट दिसून येते की गीतेचे यथार्थ नाव ‘श्रीमद्भगवद्गीतोपनिषद्’ – म्हणजे श्रीमद्भगवंतांनी गाइलेले उपनिषद – असे आहे. गीतेत परब्रह्मविषयक ज्ञान निहित असल्यामुळे ती ब्रह्मविद्या आहे, त्याबरोबरच तीत त्या ज्ञानाच्या प्राप्तीचे उपाय देखील असल्यामुळे ते योगशास्त्रही आहे. गीता ही सर्वशास्त्रमयी आहे. श्रीशंकराचार्यांच्या शब्दांत ती ‘समस्तवेदार्थसारसंग्रहभूत’ अशी आहे. मोहमग्न मानवजातीच्या उद्धाराकरिता अवतरलेल्या साक्षात् परब्रह्म अशा श्रीकृष्णाने जणू अर्जुनाला निमित्त करून संपूर्ण जगाला हे ज्ञान प्रदान केले आहे. म्हणूनच असे म्हटले आहे की –गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः। या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद् विनिःसृता॥ – ‘स्वतः भगवान विष्णूच्या मुखकमलातून प्रगटलेली गीता नीट स्वायत्त करून घ्यावी – अन्य शास्त्रांचा विस्तार करण्याची गरजच काय?’ गीतेत कर्म-ज्ञान-भक्ती यांचा अतिशय मनोहारी असा समन्वय करून दाखविलेला आहे. गीता आपल्या जीवनाचा सर्वांगीण विकास करीत आपल्याला आपल्या अंतिम लक्ष्याकडे – अज्ञाननिवृत्ती व स्व-स्वरूपप्राप्ती या परमध्येयाकडे – नेत असते. जीवनात स्वधर्माच्या यथायोग्य आचरणाने – म्हणजे फलाची आकांक्षा व आसक्ती सोडून ईश्वरार्पणभावाने स्वकर्म करीत गेल्याने – चित्त शुद्ध होते. आणि त्या शुद्ध चित्तात ज्ञान प्रगटून मनुष्य भवबंधनापासून मुक्त होतो. गीतेतील उपदेशाचा हाच प्रमुख प्रवाह आहे. गीता हा साधकांचा अतिशय प्रिय ग्रंथ आहे. गीतेवर अनेक आचार्यांनी भाष्ये व टीका रचल्या आहेत. वाचकांना मूळ संस्कृत श्लोक समजण्यास मदत व्हावी या दृष्टीने प्रस्तुत आवृत्तीत श्लोकांचा अनुवाद यथाशक्य मुळाप्रमाणेच ठेवला आहे. आशयग्रहणाच्या सोईसाठी जे आवश्यक शब्द जोडले आहेत ते कंसात घातले आहेत. याशिवाय गरजेनुसार ठिकठिकाणी तळटिपांचाही उपयोग केला आहे. अनेक महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ शांकरभाष्य व श्रीधरी टीका यांना अनुसरून केला आहे.


Added to cart
- There was an error adding to cart. Please try again.
Quantity updated
- An error occurred. Please try again later.
Deleted from cart
- Can't delete this product from the cart at the moment. Please try again later.