Rs.25.00
Author
Swami Vivekananda Pages
85 Choose Quantity
Product Details
प्रस्तुत पुस्तकात स्वामी विवेकानंदांची मातृभूमी भारताबद्दलची काही विख्यात व्याख्याने, पत्रे व लेख समाविष्ट केले आहेत. स्वामीजी फक्त एक आत्मज्ञानी महापुरुष नव्हते तर ते एक खरोखरचे श्रेष्ठ देशभक्त होते. त्यांनी भारतात आसेतुहिमालय भ्रमण केले आणि समाजाच्या प्रत्येक वर्गाचे अध्ययन केले. त्यामुळे भारताच्या समस्यांचे त्यांनी मांडलेले विवरण आणि त्यांवरील उपाय सुचविण्याकरिता तेच खरे अधिकारी होत. ह्या पुस्तकात या समस्यांवरील उपाय आणि साधन यांवर मार्गदर्शन केले आहे. त्याद्वारे आजच्या समस्यांचे निराकरण करून आपल्या मातृभूमीचे गेलेले वैभव पुन: प्राप्त केले जाऊ शकते. स्वामीजी भारतीय संस्कृतीचे ज्ञाते होते. स्वतंत्र भारतात स्वामीजींचे विचार देशभक्तांना व विभिन्न क्षेत्रांत कार्य करणार्या समाजसेवकांना उद्बोधक व मार्गदर्शक ठरले आहेत. ह्या पुस्तकात स्वामीजींचे संक्षिप्त चरित्र समाविष्ट केले आहे त्यामुळे त्याची उपयोगिता निश्चितच वाढली आहे.