Product Details
आठवणी ह्या छायाचित्रांसारख्या असतात. न बघितलेल्याही व्यक्तीच्या व्यक्तित्वाची, तिचे छायाचित्र बघून बरीच अटकळ बांधता येते. स्मृतींचेही असेच आहे. स्मृत व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे आकलन होण्यास त्यांनी पुष्कळच मदत होते. स्वामी विवेकानंदांच्या सान्निध्याचे सौभाग्य ज्यांना लाभले होते अशा काही व्यक्तींनी आपल्या ‘सान्निध्य-स्मृति’ कलकत्त्याहून रामकृष्ण-संघातर्फे निघणार्या ‘उद्बोधन’ नामक बंगाली मासिकात क्रमश: प्रसिद्ध केल्या होत्या. प्रस्तुत संग्रह त्यांचाच अनुवाद आहे. स्वामीजींच्या जीवनातील सर्वच कालखंडांना ह्या आठवणींनी स्पर्श केलेला असल्यामुळे त्यात एक गोड विविधता, आणि त्याचबरोबर सुरेख एकसूत्रता निर्माण झाली आहे. ह्या समग्र स्पष्टास्पष्ट स्मृतींचे चिर-उज्ज्वल आधार स्वामी विवेकानंद यांच्या व्यक्तिमत्वाच्या नानाविध पैलूंचे दर्शन या स्मृतिचित्रांमधे वाचकांना घडेल. स्वामीजींच्या अंतरंगाचे, त्यांच्या कार्यहेतूंचे आणि कार्यांचे आकलन होण्यास त्याने मदत होईल यांत शंका नाही.