Product Details
श्रीरामकृष्णदेव हे ‘‘समन्वय व विश्वबंधुत्व’’ ह्या दिव्य संदेशाचे प्रणेते होते. ‘श्रीरामकृष्णांच्या जीवन संगीतातून जगातील हजारो धर्मपंथ व उपपंथ, यांच्या भिन्न भिन्न व विसदृश स्वरांच्या मीलनाचा मंजुळ ध्वनी निघतो.’ हे रोमाँ रोलाँ ह्या पाश्चात्त्य महापुरुषाचे उद्गार खरोखरच मोठे अन्वर्थक आहेत. आधुनिक जगातील मतामतांच्या गलबल्यात व परस्पर विरोधी हितसंबंधात प्रेमाची व विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करण्याचे कामी ह्या महान् जगद्गुरूच्या अद्वितीय जीवनाने अमूल्य अशी कामगिरी केली आहे, असा आमचा विश्वास असून महात्मा गांधींनी लिहिलेल्या प्रस्तावनेमुळे आमचा हा विश्वास दृढमूल झाला आहे. सदरहू पुस्तकात ग्रंथकार न. रा. परांजपे यांनी श्रीरामकृष्णांचे चरित्र व संदेश यांचे यथायोग्य दिग्दर्शन केले आहे. श्रीरामकृष्णांचे दिवंगत शिष्य स्वामी सारदानंद यांच्या बंगाली भाषेतील ‘लीलाप्रसंग’ ह्या अत्यंत अधिकृत चरित्रातून व इतर अनेक विश्वसनीय ग्रंथांतून मिळविलेल्या माहितीवरून परांजपे ह्यांनी हे पुस्तक लिहिले असून सर्व आधारभूत ग्रंथांची यादी त्यांनी पुस्तकास जोडली आहे.