M235 Adhunik Marathi Sahityatil Paratatwa Bodh (आधुनिक मराठी साहित्यातील परतत्त्वबोध)
Non-returnable
Tags:
Rs.150.00
Author
Dr. Sumati Risbood Pages
680 Choose Quantity
Product Details
मराठी साहित्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय आध्यात्मिक विचार-वैभवाचा हा वाङ्मयीन शोध आहे. म्हणून हा संशोधनपर ग्रंथ आहे. डॉ. सुमती रा. रिसबुड यांचा ‘आधुनिक मराठी साहित्यातील परतत्त्वबोध’ (जीवन-विकास मासिकातील संपादकीयांचा वाङ्मयीन शोध) हा ग्रंथ विश्लेषणात्मक आहे. मानव-जीवन दुर्लभ आहे ‘तरीही जडवादाची विषारी फळे चाखून मानव आज उबगला आहे’, आणि म्हणून आपले हे जीवन सफल करण्यासाठी मानवाने भारतीय धर्मशास्त्रातील, अध्यात्मशास्त्रातील, तत्त्वज्ञानातील उच्च जीवनमूल्यांची धारणा करणे व त्यांचा अनुभव येणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्या अभावी मानव-जीवन अपूर्ण व अतृप्तच राहते. म्हणून स्वामी शिवतत्त्वानंदांनी त्यांच्या संपादकीय लेखांमध्ये जीवन-तत्त्वज्ञान व तत्त्वविचार यांची सर्वसामान्य विचारशील वाचकाला समजेल, रुचेल, पचेल अशी उकल केली आहे आणि जीवनाचा यथार्थ विकास करण्यास मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या चरित्रात्मक, तात्त्विक, आध्यात्मिक व समाज प्रबोधनात्मक विवेचनांतून परतत्त्व बोधाचा विचार सातत्याने प्रकट होतो. संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायाच्या शेवटच्या ओव्यांमध्ये अशा आत्मबोधाला महाबोध, परमतत्त्व, परतत्त्व हे विशेषण लावले आहे. देह, मन व बुद्धी यांच्या अतीत असणार्या बोधस्वरूप आत्मानुभवाने मानव जीवन कृतार्थ होते. कृतकृत्य होते आणि हाच खरा खरा जीवनाचा विकास होय असे आपल्या सर्व आध्यात्मिक शास्त्रग्रंथांत प्रतिपादले आहे.