
 Rs.20.00 
Delivery
 Author 
 Swami Ranganathananda  Pages 
 32  Translator 
 Smt. Shobha Somalwar Choose Quantity
 Product Details 
लेखकाने हे चरित्र श्रीव्यासकृत ‘महाभारता’च्या आधारावरच पूर्णपणे लिहिले आहे, त्याखेरीज दुसर्या कोणत्याही पुस्तकाचा विचार सुद्धा त्यांनी या संदर्भात केलेला नाही. त्यामुळे प्रस्तुत पुस्तकात धर्मराजाचे चरित्र संपूर्णपणे साधार, लेखकांच्या प्रांजळ, रसग्राही आणि विवेचनात्मक शैलीतून साकारले आहे. कुंतीपुत्र, ज्येष्ठ पांडव, सम्राट युधिष्ठिर त्याच्या प्रसिद्ध नावाप्रमाणेच धर्मराज होता. त्याचा हा गौरव स्वयं भगवान श्रीकृष्ण, श्रीव्यास, नारदादी ऋषिमुनी तसेच भीष्म, द्रोण, विदुर या धर्मज्ञ महात्म्यांद्वारे झाला आहे. युधिष्ठिराची धर्म जाणण्याची सूक्ष्म बुद्धी, सत्यनिष्ठा, संयमितपणा, समतोलपणा, उदारता, क्षमाशीलता, दया, विवेक, न्यायप्रियता, विनय, कारुण्य, ईश्वरनिष्ठा व धर्मपरायणता या गुणांचे तसेच त्या गुणांना व्यवहारात आणण्याचे त्यांचे कौशल्य, संभाषण-चातुर्य — या सर्वांचे मनोग्राही दर्शन या चरित्रातून आपल्याला होते. सध्याच्या सांस्कृतिक, सामाजिक, नैतिक आणि राजनैतिक पातळ्यांवर प्राचीन भारताच्या आदर्शमूल्यांचा र्हास होत असलेल्या पार्श्वभूमीवर हे धर्मराज युधिष्ठिराचे चरित्र सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि चंद्राच्या चांदण्याप्रमाणे शीतल व आल्हाददायी असल्याचा अनुभव येतो. प्रस्तुत चरित्राच्या वाचनाने वाचकांच्या मनात या आदर्श जीवनमूल्यांची प्रेरणा निश्चितच निर्माण होईल.


