Rs.25.00
Author
Smt. Shakuntala D Punde Pages
145 Choose Quantity
Product Details
भगवान श्रीरामकृष्णांच्या सर्वच भक्तांनी ‘श्रीरामकृष्णवचनामृत’ हे पुस्तक निश्चितच वाचलेले असते. हे पुस्तक म्हणजे श्री. महेन्द्रनाथ गुप्त अर्थात श्री.‘म’ यांनी लिहिलेल्या मूळ बंगाली ‘श्रीश्रीरामकृष्णकथामृत’ या पुस्तकाचा अनुवाद होय. हे पुस्तक वाचल्यानंतर अवतारवरिष्ठ भगवान श्रीरामकृष्णांचे निकटचे सान्निध्य लाभलेल्या आणि त्यांची कृपा प्राप्त झालेल्या श्री.‘मं’विषयी अधिक जाणण्याची इच्छा वाचकांच्या मनामधे निर्माण होते. त्या पूर्तीसाठीच जणू श्री. अभयचन्द्र भट्टाचार्य यांनी बंगालीमधे ‘‘श्री.‘म’र जीवनदर्शन’’ हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक बंगाली भाषेत असल्यामुळे त्याचा लाभ मराठी वाचकांना होणे शक्य नव्हते. यासाठी या मूळ पुस्तकाचा सांगोपांग अभ्यास करून मराठी वाचकांना रुचेल अशाप्रकारे अनुवाद केला आहे. सुरवातीस श्री.‘म’ यांचे संक्षिप्त चरित्रही जोडण्यात आले आहे.