Rs.125.00
Author
Swami Apurvananda Pages
309 Translator
P. G. Sahastrabuddhe Choose Quantity
Product Details
श्रीसारदादेवी ह्या भगवान श्रीरामकृष्णांच्या लीलासहधर्मिणी होत. मानवजातीच्या उद्धारासाठी या मर्त्यलोकात भगवान जेव्हा अवतरतात तेव्हा प्राय: त्यांच्याबरोबर त्यांची शक्तिदेखील स्त्रीरूप धारण करून त्यांच्या लीलेत सहभागी होण्यासाठी आविर्भूत होत असते. वर्तमान युगात ही दिव्य शक्ती श्रीसारदादेवींच्या रूपात प्रकट झाली. भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्याविषयी म्हणत, ‘‘ती साक्षात् सारदा आहे — सरस्वती आहे. ज्ञान देण्यासाठी ती आली आहे. ... ती माझी शक्ती आहे.’’ स्वामी विवेकानंदांनी श्रीसारदादेवींचे — श्रीमाताजींचे — खरे स्वरूप ओळखले होते. त्यांना श्रीसारदादेवींच्या रूपात ‘जिवंत दुर्गा’ दिसत असे. या प्रत्यक्षानुभूतीच्या आधारावरच त्यांनी पुढील उद्गार काढले आहेत — ‘‘माताजींच्या जीवनाचे अपूर्व वैशिष्ट्य कोण समजू शकला आहे? कुणीच नाही. पण हळूहळू सर्वांना ते समजेल. ज्या शक्तिवाचून जगाचा उद्धार होऊ शकत नाही ती महाशक्ती भारतात पुन: जागृत करण्यासाठी माताजींचा आविर्भाव झाला आहे आणि त्यांच्या आदर्शाचे अनुसरण करून जगात पुन: एकदा गार्गी व मैत्रेयी यांच्यासारखी स्त्रीरत्ने उत्पन्न होतील.