M225 Sri Ramakrishna Kathit Bodhakatha (श्रीरामकृष्णकथित बोधकथा)
Non-returnable
Out of stock
Tags:
Rs.35.00
Author
Sri Sri Ramakrishna Pages
136 Product Details
ब्रह्म, ईश्वर व माया इत्यादी विषयींची आध्यात्मिक गूढ रहस्ये साधारण वाचकांना सुलभतेने समजत नाहीत कारण ही रहस्ये मन-बुद्धीच्या आकलनापलीकडील आहेत. परंतु जेव्हा ही महान तत्त्वे घरगुती दृष्टान्त-उदाहरणाच्या रूपात सांगितली जातात तेव्हा ती सहजपणे समजतात. भगवान श्रीरामकृष्णांनी संवाद-संभाषणांच्या द्वारे घरगुती दैनंदिन गोष्टी आणि दृष्टान्तांमधून आध्यात्मिक जीवनातील गहन रहस्ये उकलून सांगितली आहेत. म्हणून ती सामान्य वाचकांनाही समजू शकतील. प्रस्तुत पुस्तकातील अनेक गोष्टी आणि दृष्टान्त यांना रेखाचित्रांद्वारे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून त्या वाचकांच्या मन:पटलावर सहजपणे अंकित होतील आणि त्यातील रहस्ये समजण्यास मदत होईल. अशा प्रकारच्या कथा आणि दृष्टांत भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त आदी अवतार- महात्म्यांनी पूर्वी सांगितल्या आहेत असे त्यांच्या उपदेशावरून निदर्शनास येते. श्रीरामकृष्णांनी सांगितलेल्या कथा पुराणातील तसेच आपल्या सर्वांना समजतील अशा घरगुती वातावरणातील अशा आहेत, परंतु त्यांच्या समाधिलब्ध अनुभवातून व जगन्मातेच्या प्रेरणेने स्फुरलेले दृष्टान्त मात्र अप्रतिम आहेत. धार्मिक व दार्शनिक ग्रंथातील आध्यात्मिक तत्त्वे खूप चिंतन-मनन व तर्काद्वारेही हृदयंगम होऊ शकत नाहीत, ती मात्र गोष्टी व दृष्टान्तरूपाने सहज समजतात, यास्तव ह्या बोधकथा आपल्या सर्वांसाठी आवश्यक व महत्त्वाच्या आहेत. ह्यांच्या वाचनाने धर्म व अध्यात्म समजण्यास कठीण नाही हे वाचकांना पटेल.