Rs.16.00
Author
Swami Vivekananda Pages
100 Translator
Swami Shivatattwananda Product Details
आजकाल नाना कारणांनी आमची दृष्टी स्वत:कडे वळत आहे. पण आपण कोण आहोत, आपल्या राष्ट्रीय जीवनाचे उद्दिष्ट काय इत्यादींसंबंधी स्पष्ट, असंदिग्ध कल्पना फारच थोड्यांना असते. आपण खरोखर कोण आहोत, आपला राष्ट्रीय जीवनोद्देश काय आहे, आणि पाश्चात्त्य सभ्यतेतून काय घेतल्याने आपली प्रगती नि उन्नती होऊ शकेल, याचे विवेचन करून स्वामी विवेकानंदांनी काही लेख बंगालीत लिहिले होते, ते ‘प्राच्य ओ पाश्चात्त्य’ नामक पुस्तकाच्या रूपाने प्रसिद्ध झाले होते. ‘पूर्व आणि पश्चिम’ हा त्या मूळ ग्रंथाचा मराठी अनुवाद होय. मूळ लेख स्वामीजींनी अगदी रोजच्या व्यवहारातील, घरगुती भाषेेत लिहिले आहेत. मुळातील ती शैली आणि एकंदर वातावरण अनुवादातही आणण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला स्वत्वाची जाणीव व्हावी या हेतूने स्वामीजींनी हे तुलनात्मक पुस्तक लिहिले आहे.