Rs.50.00
Author
Swami Virajananda Pages
195 Translator
P. G. Sahastrabuddhe Product Details
या पुस्तकात, खर्या अर्थाने श्रीरामकृष्णांच्या आणि स्वामी ब्रह्मानंदांच्या उपदेशाची परंपरा सांभाळली गेली आहे. निदान पाश्चिमात्य वाचकाला तरी अगदी तीच प्रतीति येते. यांतील शैली, भावभावना, व्यवहार्यता आणि विषयवैविध्य पाहून, श्रीरामकृष्णांच्या तोंडचे शब्द ज्यांत टिपले आहेत त्या श्रीयुत ‘म’ यांच्या महान ग्रंथाची आठवण होते. मोठमोठ्या कल्पना कशातरी अंधुक, अस्पष्ट मांडल्या आहेत असे वाचकाला या पुस्तकात कोठेही आढळणार नाही; किंवा काही ढोबळ विषय घेऊन लांबलचक शब्दावडंबरपूर्ण वत्तृत्व झाडलेलेही आढळणार नाही. निरनिराळ्या स्तरांवरील भिन्नभिन्न क्षमतेच्या मुमुक्षूंनी वेळोवेळी अधिकारी पुरुषाला जे प्रश्न विचारले, त्यांची उत्तरे देताना जे संभाषण झाले, त्यातूनच या पुस्तकातील उपदेश-वचने उत्स्फूर्त झाली आहेत, असे त्यांच्या रसरशीत ताजेपणावरून स्पष्ट लक्षात येते. प्रत्येक व्यक्तीला लाभकारक वाटेल असे काही ना काही तरी या पुस्तकात आहेच आहे. बरे, असे असूनही, निवेदनात शास्त्रीय काटेकोरपणा आहे, निश्चितता, पद्धतीचे परिपालन व तंत्रज्ञान आहे. पाश्चिमात्यांनी लिहिलेल्या अध्यात्मविद्येवरील ग्रंथांत या सगळ्या गोष्टी बहुधा अभावानेच आढळतात.