Product Details
स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी जीवन आणि त्यांचे उद्बोधक विचार यांचा प्रभाव आमच्या संपूर्ण समाजाच्या जनमानसावर पडत आहे. स्वामीजींनी दिलेली प्रेरणा आज आबालवृद्धांना आपआपल्या उच्च आदर्शांकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन देत आहे. जीवनात उच्च आदर्शाची स्थापना आणि त्यासाठी मनाची त्यानुसार जडणघडण ही लहान वयातच व्हावी लागते. या दृष्टीने किशोरवयीन लहान मुलांसाठी स्वामीजींविषयी एका चांगल्या प्रबोधक आणि मनोरंजक स्फूर्तिप्रद कथांच्या चित्रमय पुस्तकाची उणीव होती. किशोर मित्रांना या पुस्तकाद्वारे स्वामीजींची ओळख होऊन पुढे त्यांचे विस्तृत चरित्र आणि त्यांचे समग्र वाङ्मय वाचण्याची आवड त्यांच्यात निर्माण होईल आणि स्वामीजींच्या आदर्श जीवनातून व उद्बोधक विचारांपासून ते प्रेरणा घेऊन आपली जीवने उन्नत करतील.