Rs.25.00
Author
Swami Siddhananda Pages
109 Translator
Swami Vipapmananda Choose Quantity
Product Details
‘स्वामी अद्भुतानंद हा श्रीरामकृष्णांचा महान चमत्कार होता.’ असे स्वामी विवेकानंद म्हणत. श्रीरामकृष्णांचे स्वामी विवेकानंदादी इतर सर्व लीलासहचर हे विद्वान, महापंडीत होते — त्यांत आपल्या अशिक्षितपणाने लाटू महाराज (स्वामी अद्भुतानंद) चट्कन उठून दिसतात. पण ‘एक दिवस तुझ्या मुखातून वेद-वेदान्तातील रत्ने बाहेर पडतील’ अशी जी भविष्यवाणी त्यांच्याबद्दल श्रीरामकृष्णांच्या मुखातून बाहेर पडली होती ती अक्षरश: सत्य झाली. त्यांच्या सरळसोप्या शब्दांतून महान आध्यात्मिक सत्ये अगदी स्वाभाविक सहजतेने बाहेर पडत. त्यांच्या शब्दांना सखोल आध्यात्मिक अनुभूतीचा प्रकाश लाभून त्यातून भक्तांना अनुपम बोध प्राप्त होत असे. अशाच काही उपदेशांचे संकलन येथे स्वामी सिद्धानंदांनी केलेले आहे. ते बंगालीमधे ‘अद्भुतानंद प्रसंग’ या नावाने प्रकाशित झाले आहे.