Book Store | Ramakrishna Math Pune
0
SVK BAROBAR PARIBHRAMAN-M-23

M170 Swami Vivekananda Barobar Paribhraman (स्वामी विवेकानंदांबरोबर परिभ्रमण)

Non-returnable
Rs.23.00
Author
Bhagini Nivedita
Pages
112
Translator
Dr. Shanta Kothekar

Choose Quantity

Add to Cart. . .
Product Details
भगिनी निवेदिता — पूर्वाश्रमीच्या कु. मार्गारेट नोबल यांचा जन्म इंग्लंड मधील आयर्लण्ड प्रांतात झाला होता. त्यांनी लंडनमधे स्वामी विवेकानंदांची काही व्याख्याने ऐकली होती. स्वामीजींच्या ओजस्वी, उद्बोधक व्याख्यानांमुळे व त्यांच्या उत्तुंग तेजस्वी व्यक्तिमत्त्वामुळे त्या प्रभावित होऊन भारतामधे सेवा करण्यासाठी आल्या होत्या. त्यांना स्वामीजींच्या मार्गदर्शनाप्रमाणे भारताच्या उत्थानासाठी कार्य करावयाचे होते. ह्याच सुमारास त्यांना स्वामीजींबरोबर उत्तर भारताचा दौरा करण्याची संधी मिळाली. ह्या भ्रमण काळात त्यांनी स्वामीजींशी झालेल्या संवादांची टिपणे घेतली होती. ह्याच टिपणांच्या आधारे ‘Notes of Some Wanderings with the Swami Vivekananda’ नामक इंग्रजी पुस्तक अद्वैत आश्रम कलकत्ता येथून प्रसिद्ध झाले आहे. प्रस्तुत मराठी पुस्तक ह्याच पुस्तकाचा अनुवाद होय. भगिनी निवेदितांची भाषा प्रभावी परंतु जुन्या वळणाची असली तरी तिचा सरळ सुंदर व समजण्यास सोपा असा मराठी अनुवाद करून दिल्याबद्दल आम्ही डॉ. शांता कोठेकर, धंतोली, नागपूर यांचे अत्यंत आभारी आहोत. भगिनी निवेदितांच्या लेखणीतून अभिव्यक्त झालेली स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तित्वाबाबतची बरीच नवीन तथ्ये ह्या पुस्तकात वाचकांना आढळतील.
Added to cart
- There was an error adding to cart. Please try again.
Quantity updated
- An error occurred. Please try again later.
Deleted from cart
- Can't delete this product from the cart at the moment. Please try again later.