Product Details
प्रस्तुत पुस्तकात गुरू नानकांच्या निवडक वचनांचा समावेश केला आहे. ही वचने जेव्हा उच्चारली गेली त्याला आता चारशे वर्षांपेक्षाही अधिक काळ लोटला आहे, परंतु या वचनांचे सामर्थ्य रेसमात्रही ढळले नाही. अगदी प्रथमोच्चाराच्या वेळी जितका असेल तितकाच नवीनपणा, तितकाच आवेश आणि तितकीच प्रेरकता आजही या वचनांमधे आहे. गुरू नानकांच्या या उपदेशांवरून त्यांचे विश्वप्रेम आणि त्यांचे विशाल हृदय यांचा प्रत्यय येतो. प्रस्तुत पुस्तकात गुरू नानकांचे संक्षिप्त चरित्र आणि स्वामी विवेकानंदांचे गुरू नानकांसंबंधी उद्गार ही देखील समाविष्ट केली आहेत.