Rs.30.00
Author
Swami Vivekananda Pages
115 Product Details
स्वामी विवेकानंदांनी भारतात आणि परदेशात हिंदुधर्मावर जी व्याख्याने दिली होती त्यांतील अत्यंत महत्त्वाच्या व्याख्यानांचा संग्रह प्रस्तुत पुस्तकात केला आहे. हिंदुधर्माची मूलतत्त्वे कोणती आहेत, वेदप्रणीत हिंदुधर्माचे स्वरूप कशा प्रकारचे आहे, हिंदुधर्माचे तत्त्वज्ञान कशात साठले इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर स्वामी विवेकानंदांनी ह्या व्याख्यानांमध्ये प्रकाश पाडला आहे. ज्या दिव्य सत्यांवर हिंदुधर्म उभारलेला आहे त्यांचे सांगोपांग वर्णन व विश्लेषण स्वामी विवेकानंदांनी आपल्या व्याख्यानांत केले आहे आणि हिंदुधर्माचे व्यापक व विशाल स्वरूप दर्शवून दिले आहे. हिंदुधर्मावर ज्यांचे प्रेम आहे आणि हिंदुधर्माचे मूलभूत सिद्धान्त जाणून घेण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना प्रस्तुत पुस्तकापासून खचित लाभ होईल.