M047 Atmasakshatkar : Sadhana Va Siddhi (आत्मसाक्षात्कार : साधना व सिध्दी)
Non-returnable
Tags:
Rs.35.00
Author
Swami Vivekananda Pages
130 Translator
L K Aarawkar Choose Quantity
Product Details
आत्मसाक्षात्काराचे स्वरूप आणि तो प्राप्त करून घेण्याचे मार्ग या विषयावर स्वामी विवेकानंदांनी पाश्चात्त्य देशांत जी नऊ व्याख्याने दिली होती त्यांचा संग्रह प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे. स्वामीजींनी या व्याख्यानांमधे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात कोणत्या अडचणी येतात आणि त्यांच्यावर मात करण्याचे उपाय कोणते यासंबंधी विवेचन केले आहे. आत्मानुभूतीचा महिमा वर्णून तिचा मानवजीवनावर कोणता परिणाम होतो याचे त्यांनी या व्याख्यानांत वेधक भाषेत दिग्दर्शन केले आहे. सगळे जग सुखाचा शोध करीत आहे, मानवाचे प्रत्येक कर्म सुखप्राप्तीच्या इच्छेने प्रेरित होत आहे, पण खरे सुख कशात आहे याचे सामान्य मानवाला ज्ञान नसते. स्वामी विवेकानंदांनी प्रस्तुत व्याख्यानांमधे खर्या सुखाचे स्वरूप काय आहे हे सांगून त्याच्या लाभाचे उपाय कोणते आहेत हे मर्मग्राही पद्धतीने दाखवून दिले आहे. या कंटकाकीर्ण जगात ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होऊन जीवन सफल होण्यासाठी प्रस्तुत पुस्तक उपयुक्त ठरेल.