Product Details
स्वामी विवेकानंदांची आपल्या शिष्यांशी आणि विभिन्न व्यक्तींशी नाना प्रकारच्या महत्त्वपूर्ण विषयांवर वेळोवेळी संभाषणे होत. प्रस्तुत पुस्तकात भारतातील, तसेच अमेरिकेतील स्वामी विवेकानंदांच्या काही संवादांचे व संभाषणांचे संकलन केले आहे. हे संवाद व ही संभाषणे केवळ धार्मिक विषयांवरच होत असत असे नव्हे, तर बोलण्याच्या ओघात स्वामी विवेकानंद सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक इत्यादी विषयांचा देखील परामर्श घेत. या विविध विषयांबरोबरच स्वामी विवेकानंदांचे आपल्या मातृभूमीच्या पुनरुत्थानासंबंधीचे ओजस्वी विचार आपल्याला या संभाषणांत आढळून येतात. या सर्वच विषयांवरील त्यांचे विचार अत्यंत उद्बोधक असून जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणार्या व्यक्तींना त्यांच्यापासून नवीन स्फूर्ती प्राप्त होते.