
Product Details
प्रस्तुत पुस्तक हे स्वामी विवेकानंदांनी अमेरिका, इंग्लंड, आणि भारतात ठिकठिकाणी दिलेल्या भाषणांचे संकलन आहे. प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट असलेले सर्व साहित्य, आमच्या मठाने प्रसिद्ध केलेल्या ‘स्वामी विवेकानंद ग्रंथावली’तून संकलित केलेले आहे. कर्मयोगाच्या साधनेच्या विविध अंगांचा स्वामी विवेकानंदांनी या पुस्तकात ऊहापोह केला आहे. साध्या- इतकेच साधनही कसे महत्त्वाचे आहे, कर्मयोगाच्या साधनमार्गात साधक का व कसा मार्गभ्रष्ट होतो, आणि त्यातील धोके चुकविण्यासाठी काय काळजी घ्यावयास हवी, या सर्वांवर स्वामी विवेकानंदांनी येथे प्रकाश टाकला आहे. सुखाच्या, शांतीच्या, मुक्तीच्या आशेने तथाकथित कर्मयोग करू धजताच दु:ख, अशांती आणि गुलामगिरी पदरात पडते; मग या कर्मयोगाचे रहस्य कशामध्ये आहे हे स्वामी विवेकानंदांनी येथे साधकांना विषद करून सांगितले आहे. भगवद्गीतेमध्ये प्रतिपादित कर्मयोगाचा स्वामीजींनी पुरस्कार केला आहे आणि हा कर्मयोगाचा आदर्श मनुष्य जीवनात चारित्र्याची प्रचंड शक्ती अभिव्यक्त करतो. आपले सामूहिक जीवन योग्य रीतीने घडण्यास व वैयक्तिक आध्यात्मिक उद्दिष्ट साधण्यास या पुस्तकाचे साहाय्य वाचकवर्गास होईल.