Rs.65.00
Author
Bhagini Nivedita Pages
264 Translator
Dr. Shanta Kothekar Choose Quantity
Product Details
स्वामी विवेकानंदाच्या मानसकन्या म्हणून ओळखल्या जात असलेल्या, त्यांच्या प्रिय शिष्या भगिनी निवेदिता यांनी आपल्या गुरुदेवांचे इंग्रजीत लिहिलेले चरित्र ‘The Master As I Saw Him’ आता मराठीमधून ‘मला प्रतीत झालेले माझे गुरू’ या नावाने, वाचकांना सादर करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आपला अमेरिकेतील धर्मदिग्विजय गाजत असतानाच स्वामी विवेकानंदांनी युरोपातही व्याख्यान-दौरा केला होता. तेथे त्यांच्यामुळे प्रभावित झालेल्या अनेकांपैकी आयर्लंडमधील एक तडफदार व्यक्तित्व म्हणजे — कुमारी मार्गारेट नोबल. त्याच पुढे स्वामी विवेकानंदांच्या शिष्या बनून भगिनी निवेदिता झाल्या. आपल्या गुरुदेवांच्या सहवासाचा लाभ त्यांना मिळाला. त्यातून त्यांना भावत गेले — प्रतीत झाले — स्वामी विवेकानंद यांचे एकेक नवनवे वैशिष्ट्य; म्हणजे त्यांचे अलौकिक व्यक्तित्व, त्यांचे ऋषितुल्य जीवन, हिंदुधर्मांतर्गत त्यांनी आणलेली उदार, प्रगतिशील आध्यात्मिक विचारसरणी, त्यांचे मानवप्रेम आणि नि:सीम राष्ट्रप्रेम व त्यांची अतींद्रिय दैवी शक्ती. तेव्हा, ही सारी प्रचीतीच त्यांनी विस्ताराने आपल्या ह्या ग्रंथात मांडली आहे. त्या लिहितात — ‘‘उदात्त आदर्श हे आमच्या गुरूंच्या विचारांचे महत्त्वाचे घटक होते; मात्र ते इतक्या सजीवपणे मांडले जात की ते निर्जीव आहेत असे कधी वाटत नसे. ह्या आदर्शांच्या मदतीने, व त्यांच्या आधारे स्वामीजी माणसांच्या व राष्ट्राच्या नैतिक उंचीवर भाष्य करीत.’’