Rs.25.00
Author
Swami Ashokananda Pages
105 Translator
Sri K T Kolate Choose Quantity
Product Details
साधक जेव्हा आध्यात्मिक मार्गावर अग्रसर होतो तेव्हा त्याला मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता असते. मार्गदर्शन करण्यासाठी खरेतर गुरूच सर्वात समर्थ असतात. परंतु गुरूचे सान्निध्य व मार्गदर्शन साधकाला नेहमीच प्राप्त होणे शक्य नसते. अशा वेळी त्याला मार्गदर्शक ग्रंथ वा पुस्तके उपयोगी पडतात. प्रस्तुत पुस्तकात अध्यात्म-मार्गाचे सखोल, तरी देखील सर्वांना समजेल असे अनुभवी विवेचन केले आहे. सर्वच स्तरांवरील साधकांना — (अविवाहित गृहस्थ, वानप्रस्थी व संन्यासी) — उपयोगी पडेल असे या मार्गाचे विविध पैलू, बारकावे, अडचणी, पथ्ये इत्यादींचे स्पष्ट व रीतसर विवेचन स्वामी अशोकानंदांनी या छोटेखानी पुस्तकात केले आहे. शिवाय धर्म, पूजापाठ, प्राणायाम, बुद्धिवाद, त्याग, ब्रह्मचर्य या मूलभूत बाबींवर चर्चा करून शेवटी आहार कसा करावा, गुरू कसा पारखावा याचे सडेतोड मार्गदर्शन या पुस्तकात केलेले आहे. अध्यात्ममार्ग कोणासाठी आहे हे समजावून सांगून त्यानुसार स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. खरेतर हे पुस्तक म्हणजे अध्यात्ममार्ग चोखाळणार्या साधकांसाठी एक आचारसंहिताच आहे.