Rs.10.00
Author
Swami Shivatattwananda Pages
24 Choose Quantity
Product Details
आजच्या काळातील हिंदू स्त्रियांसमोर ‘घर की घराबाहेर’, ‘नवे की जुने’ असे अनेक प्रकारचे प्रश्न उभे आहेत आणि या प्रश्नांना तोंड देता देता त्या मेटाकुटीस आल्या आहेत. विशेषत: आधुनिक शिक्षण घेतलेल्या स्त्रियांच्या जीवनात आज विभिन्न प्रकारचे मानसिक संघर्ष निर्माण होत आहेत. स्वत:च्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांना जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये पुरुषांबरोबर म्हणा किंवा इतर स्त्रियांबरोबर म्हणा, नोकरी करावी लागत आहे अथवा अन्य प्रकारचे कार्य करावे लागत आहे. विभिन्न निमित्तांनी घराबाहेर पडलेल्या या स्त्रियांना अनेक समस्यांशी सामना करावा लागतो. बाहेरच्या जगाशी संघर्ष आणि आतला मानसिक संघर्ष असे या सामन्याचे द्विविध स्वरूप आहे. या संघर्षामुळे व आंतरिक दु:खामुळे आधुनिक काळातील हिंदू स्त्रिया गांगरून गेल्या आहेत. या संघर्षांतून व दु:खांतून मुक्त होण्यासाठी कोणता उपाय आहे, आणि ‘स्त्री’त्वामुळे प्राप्त झालेले विशिष्ट प्रकारचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी व त्याला आदर्श रूप देण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत यासंबंधीचे मुलग्राही, विस्तृत व सुबोध विवेचन प्रस्तुत पुस्तकात केले आहे. गीता-उपनिषदादी शाश्वत स्वरूपाच्या धर्मग्रंथांनी आणि अवतार महापुरुषांनी जी आध्यात्मिक शिकवण दिली आहे ती आत्मसात करून, ती जीवनामध्ये उतरवून आणि त्याबरोबरच पाश्चात्त्य भौतिक संस्कृतीत जे काही ग्राह्य आहे, जे काही विधायक, उन्नतिकारक, शुभ, श्लील नि चांगले आहे ते घेऊन भावी काळातील हिंदू स्त्रियांना स्वत:चा खराखुरा अंतर्बाह्य, सर्वांगीण विकास कसा करून घेता येईल हे प्रस्तुत पुस्तकात संयुक्तिक पद्धतीने दर्शवून दिले आहे.