Book Store | Ramakrishna Math Pune
0
ISHA UPANISHAD   M-20
ISHA UPANISHAD   M-20
ISHA UPANISHAD   M-20
ISHA UPANISHAD   M-20
ISHA UPANISHAD   M-20
ISHA UPANISHAD   M-20
ISHA UPANISHAD   M-20
ISHA UPANISHAD   M-20
ISHA UPANISHAD   M-20

M267 Isha Upanishad - Vishnu Vaman Bapat shastri [ईश उपनिषद शांकरभाष्य (मूल व अर्थ)]

Non-returnable
Out of stock
Rs.20.00
Author
Pt. Vishnu Vaman Bapat Shastri
Pages
45
Product Details
अनादी अनंत ज्ञानराशी म्हणजे वेदान्त” अशी वेदान्ताची स्वामी विवेकानंदांनी व्याख्या केली आहे. उपनिषदे व वेदान्त या विषयांवर बोलताना ते असे म्हणतात, “नंतरच्या काळात भारतीय धार्मिक विचारसरणीचा जो विकास झाला त्याची बीजेसुद्धा आपल्याला उपनिषदांत आढळतात. उपनिषदांत भक्तीविषयक आदर्श आढळत नाही असे काही वेळा उगीचच, मोठ्या आग्रहाने प्रतिपादन केले जाते. ज्यांनी उपनिषदांचे अध्ययन केले आहे त्यांना या विधानाची असत्यता कळेल. आपण नीट पाहिल्यास, प्रत्येक उपनिषदात आपल्याला भक्तीची पुष्कळशी तत्त्वे आढळतील.

परंतु ज्या बऱ्याचशा कल्पना नंतरच्या स्मृतिग्रंथांतून व पुराणग्रंथांतून विकसित झालेल्या दिसतात त्या उपनिषदांत केवळ बीजरूपाने आढळतात. या कल्पनांची रूपरेखा व आराखडा उपनिषदांत पाहावयास मिळतो. काही पुराण-ग्रंथांतून हा आराखडा पूर्ण केलेला दिसतो. पण चांगला विकसित झालेला असा एकही भारतीय आदर्श नाही की ज्याचे मूळ या उपनिषदांत सापडत नाही.

उपनिषत्कालीन ऋषींची विशाल मने, आज कल्पनाही करता येणार नाही इतक्या धैर्याने व शौर्याने पुढे झेपावली आणि त्यांनी, आजवर मानवजातीला कधीही सांगितली गेली नव्हती इतकी उदात्त सत्ये निर्भयपणे व कोणत्याही प्रकारची तडजोड न करता उद्घोषित केली. माझ्या देशबांधवांनो, मला आपणांपुढे हीच सत्ये मांडावयाची आहेत. (विवेकानंद ग्रंथावली, खंड ५, पृ. १३९,२७५)

विचारांचे साहस, सुंदर काव्यमय भाषा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मप्रत्ययाने निथळलेल्या शब्दपंक्ती हे उपनिषदांचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

पवित्र व तपःपूत ऋषींच्या सत्यशोधक हृदयांत स्फुरलेल्या या दिव्यगूढ अनुभूतींना श्रीशंकराचार्यांनी आपल्या भाष्यातून अधिक सुस्पष्ट रीतीने मांडले आहे. उपनिषदांतील अनुभूतींची तरलता राखून त्यांची दार्शनिक रचना करणे हे आचार्यांचे योगदानच म्हणता येईल.

या पुस्तकाच्या पुनर्मुद्रणप्रसंगी आम्ही भाषांतरकार व संपादक आचार्यभक्त (कै.) श्री. विष्णू वामन बापटशास्त्री यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. सनातन धर्माची ही अनमोल ठेव त्यांनी मराठी साधक-जिज्ञासू वाचकांसाठी उपलब्ध करवून देऊन आम्हा सर्वांनाच उपकृत केले आहे, असे आम्ही मानतो.
Added to cart
- There was an error adding to cart. Please try again.
Quantity updated
- An error occurred. Please try again later.
Deleted from cart
- Can't delete this product from the cart at the moment. Please try again later.