Rs.15.00
Author
Swami Vivekananda Pages
104 Translator
S V Atre Product Details
स्वामी विवेकानंदांनी भारतात आणि परदेशात धर्मावर अनेक वर्ग घेतले व विभिन्न ठिकाणी त्यांनी धर्मावर अनेक व्याख्याने दिली. या वर्गांमधे त्यांनी जो उपदेश केला आणि निरनिराळ्या स्थळी त्यांनी जी व्याख्याने दिली त्यांतील काहींच्या टिपणांचा संग्रह प्रस्तुत पुस्तकात केला आहे. स्वामी विवेकानंदांनी प्रस्तुत पुस्तकात व्यापक आणि उदात्त भूमिकेवरून धर्माचे विवरण केले आहे. सर्व धर्म म्हणजे विभिन्न स्त्री-पुरुषांचा विभिन्न अवस्थांमधून व विभिन्न परिस्थितीमधून आत्मज्ञानाच्या वा ईश्वरलाभाच्या ध्येयाकडे होणारा जणू प्रवासच आहे. सगळे धर्म मानवमात्राला या एकाच अंतिम ध्येयाकडे घेऊन जातात. धर्म हा केवळ शब्दांत आणि मतमतांतरात साठलेला नाही, तर तो आत्मज्ञानातच निहित आहे. हे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ज्ञान, भक्ती, ध्यान, कर्म इत्यादी जी साधने आहेत त्यांचे सुबोध आणि तर्कसंगत विवेचन स्वामी विवेकानंदांनी प्रस्तुत पुस्तकात केले आहे. नैतिकता, मानसिक पावित्र्य, निष्कपट हृदय, आत्मसमर्पणाचा भाव इत्यादी साधने मानवाला आत्मसाक्षात्काराच्या ध्येयाकडे घेऊन जातात. खरा ध्येयनिष्ठ साधक धर्मावरून कधीही भांडण वा झगडा करीत नाही. स्वामी विवेकानंद म्हणत, “धर्मावरून होणारी भांडणे ही धर्माच्या बाह्यांगावरूनच होत असतात. जेव्हा पावित्र्य व आध्यात्मिक वृत्ती ही लोप पावतात तेव्हाच हृदय शुष्क होते व भांडणे सुरू होतात.” धर्मावरून होणारे कलह जर थांबवावयाचे असतील तर त्यासाठी स्वामी विवेकानंदांनी यथार्थ धर्माचे व धर्मसाधनांचे जे दिग्दर्शन केले आहे त्याचे अध्ययन करणे अगत्याचे आहे. या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकाचे परिशीलन धर्ममार्गाचे अनुसरण करणाऱ्या साधकांच्या पक्षी अत्यंत लाभदायक ठरेल.