Product Details
प्रस्तुत पुस्तक रामकृष्ण मठ व मिशन या संस्थेचे अध्यक्ष श्रीमत् स्वामी वीरेश्वरानंद महाराज यांच्या सतरा व्याख्यानांचा संग्रह आहे. ही व्याख्याने प्रामुख्याने तरुणांना व विद्यार्थ्यांना उद्देशून दिलेली आहेत. या व्याख्यानांतून आपल्याला स्वामीजींच्या खोल अंतर्दृष्टीचा व दूरदृष्टीचा स्पष्ट प्रत्यय येतो. देशाची सद्य:स्थिती पाहून त्यांना किती वेदना होतात व ती सुधारावी यासाठी किती तळमळ वाटते हे ही व्याख्याने वाचताना लक्षात येते. देशाच्या उन्नतीसाठी त्यांनी सुचविलेले उपाय खरोखरच अचूक आणि व्यवहार्य आहेत. आज युवाशक्तीवरच आपल्या देशाचे भविष्य अवलंबून आहे. आपल्या युवकांनी या पुस्तकातील मर्म आत्मसात केल्यास आपल्या देशाचे हित निश्चितच साधेल. स्वामीजींनी यांतील काही व्याख्याने बंगालीत व उरलेली इंग्रजीत दिली होती. प्रस्तुत पुस्तकात व्याख्यानांचा मराठी अनुवाद दिला आहे. या मौल्यवान विधायक विचारांचा व्यापक प्रचार-प्रसार झाल्याने देशात सर्वत्र शुभंकर परिणाम दिसून येतील.