
Non-returnable
Tags:
Rs.300.00
Delivery
Author
Swami Saradananda Pages
1079 Translator
Swami Shivatattwananda Choose Quantity
Product Details
भगवान श्रीरामकृष्ण हे ईश्वरत्वाची, दिव्यत्वाची साक्षात् मूर्तीच होते. आध्यात्मिक पूर्णत्वाचे स्वरूप कसे असते हे त्यांच्या पवित्र जीवनावरून कळून येते. त्यांच्या जीवनातून निःसृत झालेला आध्यात्मिक स्रोत आज जगभर पसरलेला दिसून येतो आणि या स्रोताने पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धातील असंख्य जीवने प्रभावित झालेली दिसून येतात. त्यांच्या अपूर्व जीवनाने व दिव्य वाणीने कितीतरी जीवांना नवीन आशा, सांत्वना, उत्साह व शांती प्राप्त झाली आहे. आणि त्यांचे अज्ञान नष्ट होऊन त्यांना ज्ञानालोक लाभला आहे.
ज्या जीवनात ज्ञान, भक्ती व कर्म यांचा परमोच्च विकास झालेला दिसून येतो, जे जीवन पावित्र्याचे व कामगंधहीन प्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक आहे आणि ज्या जीवनात नाना मतांच्या व नाना धर्मांच्या साधनांचे अनुष्ठान होऊन त्या त्या साधनांचे अंतिम लक्ष्य हस्तगत झालेले आहे, अशा सर्वांगपरिपूर्ण जीवनाचे सांगोपांग वर्णन आणि विश्लेषण त्यांच्याच एका अधिकारी अंतरंगीच्या शिष्याने – श्रीमत् स्वामी सारदानंदांनी – ‘श्रीरामकृष्णलीलाप्रसंग’ या ग्रंथात केले आहे. स्वामी सारदानंदजी हे श्रीरामकृष्ण-संघाच्या स्थापनेपासूनच त्याचे सचिव (सेक्रेटरी) होते आणि आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत (इ. स. १९२७ पर्यंत) त्यांनी हे महत्त्वाचे पद विभूषित केले. त्यांनी बंगालीत लिहिलेल्या या चरित्रग्रंथात अन्य चरित्रांमध्ये न आढळणाऱ्या कितीतरी नवीन घटनांचा व गोष्टींचा समावेश आहे. म्हणूनच उपलब्ध असलेल्या श्रीरामकृष्णांच्या सर्व चरित्रांमध्ये ‘श्रीरामकृष्णलीलाप्रसंग’ हा चरित्रग्रंथ केवळ अधिक विस्तृतच नव्हे, तर अधिक अधिकृत व अधिक विश्लेषणात्मक आहे. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे भगवान रामकृष्णांच्या जीवनाचे नुसते वर्णनच नसून त्यात भारतातील व भारताबाहेरील विभिन्न संप्रदायांच्या व धर्मार्ंच्या तत्त्वज्ञानांचेही सविस्तर वर्णन व विश्लेषण आहे. या दृष्टीने प्रस्तुत ग्रंथ म्हणजे धर्म व तत्त्वज्ञान यांचा जणू विशाल कोशच आहे असे आपल्याला म्हणता येईल.