Rs.6.00
Author
Compilation Pages
78 Product Details
भगवान बुद्धांच्या उपदेशांनी मानवाच्या जीवनात दीपस्तंभासारखे कार्य केले आहे. त्यांचे हे निवडक आणि उत्कृष्ट उपदेश सर्वांना आवडतील असा आम्हाला विश्वास वाटतो. बौद्धधर्माची प्रमुख तत्त्वे प्रस्तुत पुस्तकात आरंभीच दिली आहेत. तसेच, भगवान बुद्धांचे संक्षिप्त चरित्र आणि बुद्धावस्थेची प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम सारनाथ येथे दिलेला उपदेश यांचाही समावेश या पुस्तकात केला आहे. स्वामी विवेकानंदांना भगवान बुद्धांविषयी फार आकर्षण आणि प्रेम वाटत असे. त्यांनी या अवतारी महापुरुषासंबंधी वेळोवेळी जे अमर उद्गार काढले आहेत त्यांपैकी काही उद्गार प्रस्तुत पुस्तकात घातले आहेत आणि कविवर रवींद्रनाथ ठाकुर यांनी लिहिलेले ‘बुद्धस्तवन’ही या पुस्तकात समाविष्ट केले आहे.