Product Details
मर्यादापुरुषोत्तम श्रीरामचंद्रांचे जीवन हे आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण तर आहेच, परंतु त्यांच्या समग्र जीवनातून सांस्कृतिक, सामाजिक, नैतिक आणि राजनैतिक असे अनेक पैलू देखील प्रस्फुटित झाल्याचे आपल्याला दिसते. तसेच आपल्या दैनंदिन, व्यावहारिक जीवनामध्ये देखील त्यांचे चरित्र उद्बोधक आणि मार्गदर्शक असे आहे. श्रीरामचंद्रांचे जीवन सत्यनिष्ठा, संयम, मातृ-पितृ-भक्ती आणि प्रेम यांचे ज्वलंत उदाहरण आहे. हे पावन चरित्र वाचल्याने वाचकांच्या मनात आध्यात्मिक स्पृहा आणि आदर्श जीवन मूल्याची प्रेरणा निश्चितच निर्माण होईल.