Rs.25.00
Author
Swami Vivekananda Pages
65 Choose Quantity
Product Details
सर्वसाधारणपणे व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे आपण आपल्या अवतीभोवतीच्या लोकांवर ‘प्रभाव’ पाडणे, आपल्याला नोकरीत उच्च हुद्दा, समाजात मानाचे स्थान, उद्योगधंद्यात अधिक मिळकत, शिक्षणात अधिक पदव्या किंवा प्राविण्य मिळविणे इत्यादींनाच विकास समजत असतो. हे सर्व आपल्या ‘मी’पणाशी संबंधित असते. परंतु हा ‘मी’ म्हणजे कोण हे आपल्याला माहीत नसते. तरीही समाजात ज्या ज्या गोष्टींचे प्रचलन अधिक अशा विशिष्ट शैली, जीवनपद्धती, आचारविचारांना आत्मसात करण्याकडेच आपला कल असतो. त्याप्रमाणे व्यक्तिमत्त्वाचा विकास करायला जाऊन आपण आपले वागणे व बाह्य रूप-रंग अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करतो व अखेर आपल्या ध्यानात येते की खरोखर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकासच झालेला नाही. कारण हे व्यक्तिमत्त्व अर्थात आपला ‘मी’ हा या आपल्या शरीर-मनाहून भिन्न अशी गोष्ट आहे. त्याला प्रथम जाणून घेतले पाहिजे. ते आपले खरे आध्यात्मिक स्वरूप असल्यामुळे त्याचाच संपूर्ण विकास म्हणजेच आपल्या स्वरूपाप्रत पोचणे होय. आणि हाच खरा व्यक्तिमत्त्वाचा विकास होय. स्वामी विवेकानंदांनी आपल्या प्रवचनांमधे आणि लिखाणांमधे वेळोवेळी याच गोष्टीचा ऊहापोह केला आहे. त्यांच्या ग्रंथावलीमधून अशा प्रकारचे व्यक्तिमत्त्व विकासाबाबतचे विचार या ठिकाणी संकलित केले आहेत.