Rs.20.00
Author
Swami Vivekananda Pages
31 Choose Quantity
Product Details
स्वामी विवेकानंदांना अगदी लहानपणापासूनच रामायण ऐकण्याची मनस्वी आवड होती. घराच्या जवळपास कुठे रामायणपाठ होत असल्यास खेळणे वगैरे सारे सोडून देऊन ते रामायण ऐकण्यास धाव घेत. त्यांनी सांगितले होते की कधी कधी तर रामायण ऐकताना ते असे तन्मय होऊन जात की त्यांना घराबिराचा पार विसर पडून जाई. रात्र झाली आहे, घरी परत जावयास हवे वगैरे कुठल्याच गोष्टीचे भान त्यांना उरत नसे. एकदा त्यांनी ऐकले की हनुमान केळीच्या वनात असतात. या गोष्टीवर त्यांचा इतका विश्वास बसला की त्या दिवशी रामायण ऐकून झाल्यावर घरी परत न जाता घराजवळीलच एका बागेत जाऊन ते एका केळीच्या झाडाखाली हनुमानाचे दर्शन होईल या आशेने बर्याच रात्रीपर्यंत बसले! रामायणातील इतर व्यक्तींपेक्षा स्वामीजींची हनुमंतावर विशेष भक्ती होती. संन्यासी झाल्यानंतरही अनेकदा महावीर हनुमानाच्या गोष्टी निघाल्यास ते अगदी तन्मय होऊन जात व पुष्कळदा मठात हनुमानाची एखादी सुरेख मूर्ती स्थापन करण्याच्याही गोष्टी करीत. स्वामी विवेकानंदांनी 31 जानेवारी 1900 रोजी, अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियातील पॅसाडेना येथील ‘शेक्सपिअर क्लब’मध्ये ‘रामायण’ या विषयावर एक व्याख्यान दिले होते; तसेच इतरत्रही त्यांनी रामायणातील विविध व्यक्तिरेखांवर विचार मांडले होते. त्यांची उपादेयता लक्षात घेऊन त्यांचे संकलन प्रस्तुत पुस्तिकेच्या रूपात आम्ही प्रकाशित करीत आहोत. वाचकांना ही पुस्तिका निश्चितच उपयोगी पडेल.