


M276 Sri Matajinchya Charanashrayee - 3 (श्रीमाताजींच्या चरणाश्रयी - भाग ३)
Non-returnable
Out of stock
Tags:
Product Details
या तिसऱ्या भागातील दशम पर्वात श्रीमाताजींनी शिष्यांना, भक्तांना पाठवलेल्या पत्रांचा अनुवाद आला आहे. एकादश पर्वात श्रीरामकृष्णांच्या संन्यासी शिष्यांनी व गृही पुरुष-महिला भक्तांनी सांगितलेल्या श्रीमाताजींच्या आठवणी आहेत, तर द्वादश पर्वात श्रीमाताजीच्या संन्यासी शिष्यांनी सांगितलेल्या स्मृतिकथा आहेत. त्रयोदश पर्वात श्रीमाताजींच्या गृही शिष्यांच्या आठवणी आहेत. परिशिष्टामध्ये “श्रीमाताजींच्या इहलोकातील अखेरच्या दिवसांची दिनलिपी देण्यात आलेली आहे, तसेच इतर काहीजणांच्या, विशेषतः श्रीविभुतीबाबू घोष (कालोमाणिक) यांच्या हृदयस्पर्शी आठवणी आहेत.
हे समग्र तीन भाग वाचताना, आपण श्रीमाताजींच्या साक्षात सान्निध्यात आहोत, असे वाचकांना निश्चितच जाणवेल. सद्ग्रंथांचे वाचन केले म्हणजे सत्संगाचाच लाभ होतो याची प्रचिती वाचकांना अवश्य होईल. सत्संगाच्या महिम्याचे भक्तिशास्त्रात अनेक प्रसंगी वर्णन करण्यात येते. सत्संगाचे महत्त्व भक्तांच्या जीवनात अनन्यसाधारण असेच असते. श्रीमाताजींच्या कृपेमुळेच या तीनही भागांचा अनुवाद प्रकाशित झाला.