








 Rs.100.00 
Delivery
 Author 
 Swami Vivekananda  Pages 
 352  Translator 
 Swami Shivatattwananda Choose Quantity
 Product Details 
प्रस्तुत पुस्तक म्हणजे स्वामी विवेकानंदांनी वेदान्तावर व आध्यात्मिक विषयांवर दिलेल्या व्याख्यानांचा संग्रह होय. विभिन्न व्याख्यानांत स्वामी विवेकानंदांनी वेदान्तातील व अध्यात्मशास्त्रातील गूढ वाटणार् या सत्यांचे ओजस्वी भाषेत तर्कशुद्ध पद्धतीने अतिसुबोध विवेचन केले आहे. वेदान्ताचे रहस्य व उपनिषदांचे मर्म समजण्यास वाचकांना प्रस्तुत पुस्तकापासून खचित मार्गदर्शन लाभेल. आपल्या वैयक्तिक व सामूहिक जीवनात वेदान्त कसा उपयोगी पडू शकतो आणि उपनिषदांतील सत्यांवर जर आपण आपले जीवन आधारले तर अंती आपले कसे कल्याण होते हे स्वामी विवेकानंदांनी या व्याख्यानांतून स्पष्टपणे दर्शवून दिले आहे. वास्तविक पाहता अद्वैत वेदान्तातच मानवी विचाराची परिणती होते. वेदान्तप्रणीत एकत्वाचा सिद्धान्त आधुनिक जगाच्या अंर्तिवकासाच्या दृष्टीने कसा उपकारक आहे याचे स्वामी विवेकानंदांनी आपल्या या व्याख्यानांतून सुंदर रीतीने दिग्दर्शन केले आहे. तसेच, त्यांनी मानवाच्या मूळच्या दिव्य स्वरूपावर जो भर दिला आहे व ह्या दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेण्यास मानवजातीला जे आवाहन केले आहे त्याचेही जगत्कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. प्रस्तुत पुस्तकातील सर्वच व्याख्यानांत आत्मानुभूतीतून स्फुरलेले स्वामी विवेकानंदांचे दिव्य व भव्य विचार प्रकट झाले आहेत. म्हणून त्यांचा वाचकांच्या मनावर सखोल प्रभाव पडल्यावाचून राहत नाही.


