Rs.185.00
Author
Compilation Pages
547 Choose Quantity
Product Details
रामकृष्ण मठ, नागपूर द्वारा दर महिन्याला प्रकाशित होणार्या ‘जीवन-विकास’ मासिकाने आपल्या प्रकाशनाची पन्नासहून अधिक वर्षे पूर्ण केली आहेत. श्रीरामकृष्ण-संघातर्फे मराठीतून प्रकाशित होणारे हे पहिलेच अधिकृत नियतकालिक! नागपूरच्या मठातून मराठी-हिंदी पुस्तकांचे होणारे प्रकाशन, मराठी व हिंदी सारस्वतात आपले वेगळेपण सिद्ध करीत असतानाच, दर महिन्याला मासिकासारखे एखादे नियतकालिक असावे ही वाचकांची मागणी जोर धरू लागली होती. श्रीरामकृष्ण-विवेकानंदांचे विचार नियमितपणे मनावर संस्कार करू लागले, तर वाचकांच्या ‘जीवना’चा ‘विकास’ साधायला ते उपयुक्तच ठरणार होते. त्यामुळे मग मराठी साहित्याच्या प्रांतात त्यावेळी संस्कारक्षम विचार देणार्या साहित्यकारांशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांच्याकडून आश्चर्यवत् असा अनुकूल प्रतिसादही मिळू लागला. 1957 पासून सुरू झालेल्या ‘जीवन-विकास’ मासिकातून अधिकृत संपादकीय लेख आणि श्रीरामकृष्ण-विवेकानंदांवरील लेखांसोबतच अन्य क्षेत्रांतही विधायक असे विचारमंथन होऊ लागले. ते विचारमंथन मग प्रासंगिक वा तात्कालिक न राहता, कालनिरपेक्ष ठरून संग्राह्य वाटू लागले. त्यातील काही लेखमालांचे ग्रंथरूपाने संग्रह यथासमय प्रकाशित झाले. मात्र इतरही अनेक लेख तसेच सुटे राहिले. त्यांच्या संग्राह्यतेचे सामर्थ्य विचारात घेऊन आता सुरुवातीच्या पन्नास वर्षांतील निवडक लेख प्रस्तुत ग्रंथरूपात उपलब्ध करून दिले जात आहेत.